|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » अँड्रॉईड 10 सिस्टीम आता ‘शाओमी’ फोनमध्येही

अँड्रॉईड 10 सिस्टीम आता ‘शाओमी’ फोनमध्येही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पिक्सेल नंतर आता ‘शाओमी’च्या फोनमध्येही अद्ययावत अँड्रॉईड 10 सिस्टीम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शाओमीच्या ‘के 20’ आणि ‘के 20 प्रो’ या स्मार्टफोनला ही सिस्टीम मिळाली आहे. शाओमीबरोबरच वनप्लस या चायना मोबाईल कंपनीलाही ही सिस्टीम उपलब्ध झाली आहे.

गुगलने नुकतीच आपली अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम ‘अँड्रॉईड 10’ उपलब्ध केली आहे. सुरुवातीला ही सिस्टीम केवळ पिक्सेल सीरीजच्या फोनलाच उपलब्ध होती. आता ती इतर कंपन्यांनाही देऊ करण्यात आली आहे. शोओमीच्या आणखी काही फोनसाठी ऑनलाईन सोर्स कोडद्वारे अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टीम मिळत आहे.

Related posts: