|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दगडूशेठ गणपतीसमोर 150 ब्रह्मवृंदांनी केला मंत्रजागर

दगडूशेठ गणपतीसमोर 150 ब्रह्मवृंदांनी केला मंत्रजागर 

पुणे /प्रतिनिधी : 

भारतीय वेदपरंपरेचा वारसा जपण्यासोबतच वेदांची सेवा करण्याकरीता दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर पुणे आणि परिसरातील 150 ब्रह्मवृंदांनी मंत्रजागर केला. भाद्रपद शुद्ध एकादशीला झालेल्या मंत्रजागराने उत्सवकाळातील मंडपात होणाऱया यज्ञविधींची सांगता झाली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यातील एकएक संहिता, पदांचे मंत्र आणि घन मंत्र याचे पठण झाल्याने वातावरणात वेगळी उर्जा निर्माण झाली होती. ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती सूत्राने मंत्रजागराचा प्रारंभ झाला. या मंत्रजागरात काही कृष्ण यजुर्वेदीही सहभागी झाले होते.

याशिवाय केरळमधील नादब्रह्म कलावेधी संस्थेच्या वतीने केरळच्या पारंपरिक पूजेच्या कलावादनातील आसुर वाद्याचे वादन करण्यात आले. या वादनामध्ये चेंडा झेलम आणि पंजारी या दोन कला वादनाचे प्रकार सादर करण्यात आले. गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुनील तटकरे, भाजपाच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. महाराष्ट्रामध्ये सुख शांती नांदू दे, दुष्काळ संपू दे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थना मान्यवरांनी यावेळी केली.

 

Related posts: