|Saturday, September 21, 2019
You are here: Home » विविधा » शांतीरथातून निघणार शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक

शांतीरथातून निघणार शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक 

पुणे /प्रतिनिधी : 

अखिल मंडई मंडळाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता निघणार आहे. यंदा 126 व्या वर्षानिमित्त पुण्याच्या गणेशोत्सवात प्रथमच विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात भगवान महावीर यांचा अहिंसा परमो धर्म असा शांतीचा संदेश देत शांतीरथात शारदा-गजानन विराजमान होणार आहेत. तसेच 15 फूट भगवान महावीरांची मूर्ती हे यंदाच्या रथाचे वैशिष्टय़ आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

शांती रथाची उंची 32 फूट इतकी आहे. नवकार मंत्रांचा समावेश रथात असणार आहे. तसेच भगवान महावीरांच्या आईला पडलेली 14 स्वप्ने देखील रथात साकारण्यात आली आहेत. आकर्षक एलईडी लाईट इफेक्टस आणि विविधरंगी फुलांची सजावट रथाला असेल. या रथाची संकल्पना शिल्पकार विशाल ताजणेकर यांची आहे. यावेळी शिवगर्जना, रमणबाग ही ढोल-ताशा पथके आणि न्यू गंधर्व ब्रास बॅन्ड मिरवणूकीत सहभागी होणार आहेत. खळदकर बंधूचे सनईवादन होणार आहे.