|Thursday, September 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » कर्करोगाला नमवून मायदेशी परतले ऋषी कपूर

कर्करोगाला नमवून मायदेशी परतले ऋषी कपूर 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर न्यूयॉर्कहुन मुंबईला परतले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांची फ्लाइट मुंबई एअरपोर्टवर लॅन्ड झाली. तिथून बाहेर निघताना कपलने मीडियाच्या फोटोग्राफर्सला पोजदेखील दिल्या आणि हसून सर्वांना अभिवादन केले. यासोबतच ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे आपण परतल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले, 11 महिने 11 दिवसांनंतर मी घरी परतलो. तुम्हा सर्वांचे आभार.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर गेल्या एक वर्षापासून कर्करोगाशी झूंज देत होते. ऋषी कपूर गेल्या वषी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. दरम्यान त्यांना आपल्या मातृभूमीची आठवण येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटले होते. अनेकदा त्यांनी भारतात परत येण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. मात्र ऋषी यांचा नाईलाज होता. अखेर ऋषी कपूर यांची कर्करोगाची झूंज संपली असून ते भारतात परलते आहेत. चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. त्यांचे विमानतळावरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू कपूरदेखील दिसत आहे. दरम्यान ऋषी कपूर यांच्या चेहऱयावरील आनंद पाहण्यासारखा आहे.