|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ज्ञानपेटीतून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

ज्ञानपेटीतून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत 

पुणे / प्रतिनिधी : 

गणेशोत्सवात प्रत्येक गणेशमंडळामध्ये श्री च्या मूर्तीपुढे दानपेटी ठेवली जाते. या दानपेटीतील रकमेचा विनोयोग समाजातील गरजूंकरीता केला जातो. परंतु या दानपेटी ऐवजी गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाने ज्ञानपेटी ठेवावी, असे आवाहन आनंदवन बहुउद्देशीय संस्थेच्या आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्र, मनोविकास प्रकल्प आणि समाजप्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट व उडान फाऊंडेशनतर्फे करण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरीता ज्ञानपेटीचे पूजन रा.स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शिरोळे रस्ता येथील श्री गुरूदत्त मित्र मंडळ येथे उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय दुधणे, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनार, सागर पांचाळ, निखील कदम, गणेश खेंगरे, विशाल धुमाळ, योगेश मोरे, बाप्पू पासलकर, विनोद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेथील बालचमूनीं देखील ज्ञानपेटीमध्ये शालेय साहित्याची मदत दिली.

रविंद्र वंजारवाडकर म्हणाले, लोकमान्य टिळकांना अपेक्षीत असा विधयक गणेशोत्सव या उपक्रमांमुळे साजरा होत आहे. गणेश ही विद्येची देवता आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वरूपात मदत देवून हा उत्सव आणखी विधयक केला आहे. त्याचबरोबर येथील विद्यार्थ्यांनी देखील केलेली ही मदत कौतुकाची गोष्ट आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांवर सामाजिक संस्कार घडतात, असे ही त्यांनी सांगितले.

डॉ. अजय दुधणे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी समाज संघटनासोबतच समाजप्रबोधनाचा उद्देश डोळय़ासमोर ठेऊन हा उत्सव सुरु केला. त्यामुळे त्यांच्या विचार अंगिकारुन हा उपक्रम प्रत्येक मंडळाने राबवावा, असा प्रयत्न आम्ही करीत आहोत. पुण्यातील गणेशमंडळांनी ठेवलेल्या ज्ञानपेटी जमा झालेले साहित्य पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर येथील गावांमधील दोन शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

 

Related posts: