|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मिनिटात 147 वेळा नाकाला जीभ लावणारे नामदेवराव…

मिनिटात 147 वेळा नाकाला जीभ लावणारे नामदेवराव… 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा मानस

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  नाकाला जीभ लावण्याचा विश्वविक्रम होवू शकतो हे ऐकायला थोडे वेगळे वाटेल. पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका मिनिटात 142 वेळा नाकाला जीभ लावण्याचा विश्वविक्रम नोंद आहे. या विक्रमाला चॅलेंज देण्याचे काम शिरोळ तालुक्यातील नामदेवरावांनी केले आहे. सद्यघडीला ते एक मिनिटात 147 वेळा नाकाला जीभ लावतात. त्यामुळे सध्या गिनीज बुकमध्ये नोंद असणारा विक्रम आपण मोडू शकतो असा त्यांना आत्मविश्वास आहे. स्वतःच्या नावे हा विक्रम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असून पुढील महिन्यात हा विक्रम गिनीज बुकमध्ये  त्यांच्या नावावर नोंद होण्याची शक्यता आहे.

 टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथे राहणारे नामदेव पुंडलिक निर्मळे यांची लहानपणापासूनच नाकाला जिभ लागत होती. याचे त्यांना आपसूक होते. प्रथम ते याकडे मनोरंजनाच्या दृष्टीतून पहायचे. 2013 साली नाकाला जीभ लावण्याचा विश्वविक्रम केल्याचे वृत्त नजरेस पडले. मग त्यानीही विक्रम करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांना सहकार्याची गरज होती. प्रथम त्यांनी मित्र परिवार व गावातील मंडळींना याबाबत कल्पना दिली. मात्र सर्वांनी त्यांचे हासू केले, यावेळी नामदेवरावांनी सर्वांना या विक्रमाबाबत समजून सांगितले. सर्वांना त्यांचे म्हणणे पटले. यानंतर त्यांना ग्रामस्थ, मित्रपरिवार यांनी पाठबळ दिले. नामदेवरावांनी नाकाला वेगाने जिभ लावण्याचा सराव सुरु केला. यामध्ये ते यशस्वी झाले. त्यांच्या विक्रमाची नोंद ग्लोबल रेकॉर्ड अँड रिसर्च फौंडेशनमध्ये नाव नोंद झाले. आता गिनिज बुकमध्ये नाव नोंदविण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. त्यानुसार त्यांचे नियोजन सुरु आहे. ऑक्टोबर 2019मध्ये गिनिज बुकची टिम शिरोळमध्ये येणार आहे. यासाठी नामदेवराव यांना गुरुदत्त साखर कारखान्याचे अर्थसहाय्य मिळाले आहे. यामध्ये ते यशस्वी झाल्यास गिनिज बुकमध्ये त्यांचे नाव नोंद होणार आहे. 

  

Related posts: