|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सुजाता पाटील यांना ‘शिक्षक भूषण’ पुरस्कार जाहीर

सुजाता पाटील यांना ‘शिक्षक भूषण’ पुरस्कार जाहीर 

कोल्हापूर

शिरोडा (ता. गोवा) येथील शिक्षक विकास परिषदेमार्फत प्रतिवषी देण्यात येणारा उत्कृष्ट शिक्षक सेवा देणाऱया शिक्षकांस दिल्या जाणाऱया राज्य पुरस्कारासाठी येथील सागरमाळ परिसरातील सरस्वती चुनेकर विद्यामंदिर या शाळेतील सहाय्यक शिक्षिका सुजाता आण्णासाहेब पाटील यांना ‘शिक्षक भूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

गेली तेवीस वर्षे त्या शिक्षण सेवेत असून विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकीक असून मुलांना घडविणे, विविध शिष्यवृत्ती परीक्षार्थींना मार्गदर्शन करणे, तंबाखूमुक्त शाळा परिसर उपक्रम राबवून त्यांना मार्गदर्शन केले आहे. लवकरच हा पुरस्कार सोहळा शिरोडा येथे होणार असून शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण 3 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचेही सौ. पाटील यांनी सांगितले.

Related posts: