|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चाकरमान्यांची परतीची वाट बिकट

चाकरमान्यांची परतीची वाट बिकट 

मुंबईतील राज्य सरकारच्या जे जे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अवघ्या पंधरा दिवसात सातजणांनी  देहदान केल्याच्या वृत्ताने राज्यात देहदानाची जागरुकता वाढल्याचे स्पष्ट होते. पुढच्याच आठवडय़ात पितृपक्ष सुरु होत आहे. देहदानाचे महत्व अशा तिथींमधून अधिक स्पष्ट होणारे आहे. अवयवदानाचे महत्व आहेच, मात्र 

कोकणवासियांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा गणेशोत्सव पार पडत आह़े पाच दिवसांचा उत्सव आटोपून मुंबई-पुण्याकडे कामाच्या ठिकाणी परतणाऱया चाकरमान्यांची संख्या देखील मोठी आह़े या चाकरमान्यांच्या परतीसाठी ऱा प़ महामंडळ आणि रेल्वेने मोठी व्यवस्था केली असली तरी ती अपुरी पडत आह़े

दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मुंबई-पुणे त्याचबरोबर अन्य ठिकाणचे चाकरमानी गावाकडे येतात़ कुलाचाराप्रमाणे कुणाकडे दीड दिवस तर कुणाकडे पाच दिवसाचा गणेशोत्सव साजरा होत असत़ो काही जणांकडे आठ दिवसाचा तर काहींकडे 10 किंवा 12 दिवसांचा उत्सव साजरा होत असत़ो ज्या चाकरमान्यांना अधिक सुट्टी, रजा मिळू शकते असे चाकरमानी कमी अधिक कालावधीसाठी गावी राहतात़ परंतु ज्यांना सुट्टी अल्प असते, असे चाकरमानी गौरीच्या सणानंतर कामाच्या ठिकाणी परतायला सुरूवात होत़े गौरी सणानंतर लगेच परणाऱया चाकरमान्यांची संख्या थोडकी असली तरी पाच दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर ती संख्या मोठी होत़े अपवादात्मक लोकांनी खासगी वाहनाने मुंबई-पुण्याकडे परतण्याचे नियोजन केलेले असले तरी बहुसंख्य गणेशभक्त ऱा प़ महामंडळाच्या बस आणि रेल्वेवर अवलंबून असतात़ ज्यांना या दोन्ही ठिकाणी संधी मिळत नाह़ी ते लोक खासगी वाहतुकीच्या गाडय़ांची मदत घेत असतात़ खासगी आरामगाडय़ांच्या व्यवस्थापनाने ऐन गणेशोत्सवात भाडेवाढ केल्याच्या तक्रार येत आहेत़ रत्नागिरीपासून विलेपार्ले-मुंबईपर्यंत प्रवास करणाऱयाला तब्बल 1700 रूपयांची आकारणी खासगी आरामगाडी चालकांकडून करण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला आह़े याविरूद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एक निवेदन परिवहन खात्याला दिले आह़े कमी अधिक प्रमाणात उत्सवातील जादा गर्दी लक्षात घेऊन भाडेवाढ करण्यात येत आह़े संधीचा अनुचित लाभ उठवण्याच्या प्रवृत्तीवर अचूक  बोट ठेवले गेले आह़े दरवर्षी गर्दी होत असत़े मर्यादेपेक्षा जादा भाडेवाढ होऊ नये असे आवाहन परिवहन खात्याकडून करण्यात येत़े पण अंमलबजावणीसाठी उदासिनता दाखवण्यात येत़े ही कथा दरवर्षीचीच आह़े

परतीच्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या गाडय़ा ओसंडून जात आहेत़ रत्नागिरी स्थानकातून दररोज सकाळी दादरला जाण्यासाठी पॅसेंजर गाडी सुटत़े ही गाडी गाठण्यासाठी प्रवासी अगदी रात्रीपासूनच स्थानकावर वस्तीला येत असल्याचे चित्र आहे. ही गाडी मडगाव रत्नागिरी आणि रत्नागिरी-दादर असा प्रवास करत असत़े मडगावला गाडीच्या देखभालीची कामे केली जात असल्याने या गाडीचा या स्वरूपाचा प्रवास ठरवण्यात आला आह़े रात्री ही गाडी मडगावहून रत्नागिरीसाठी सुटत़े साडेतीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकात पोहोचते आणि सकाळी साडेपाच वाजता गाडी रत्नागिरीहून दादरसाठी निघते. ही रेल्वे गाडी सिंधुदूर्गातूनच भरून येत असल्याने रत्नागिरीत प्रवाशांना बसण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.  रत्नागिरी स्थानकातील प्रवासी गाडीत प्रवेश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करतात़ त्यानंतर जागा मिळवण्यासाठी अनेकांची भांडणे होत असल्याचे प्रसंग अनेकवार उभे राहत आहेत़ यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतल़े मडगाव-दादर प्रवासातील काही डबे  रत्नागिरीसाठी राखीव ठेववावेत असा तो निर्णय होत़ा राखीव डब्यातून गोवा-सिंधुदुर्गातील प्रवासी बसून येत असल्याने गेंधळात वाढ होत आहे, अशी तक्रार काही प्रवाशांनी केल़ी  यावेळी रत्नागिरी-पनवेल गणपती स्पेशल रेल्वे सोडली गेल्यामुळे या रेल्वेवरील प्रवाशांचा भार काहीसा हलका होताना दिसत आहे. तरीही जागा पकडण्यासाठी रेल्वे प्रवाशांची धावपळ होताना दिसून येते. रेल्वे पोलिसांमार्फत स्थानकावर हा गोंधळ रोखण्यासाठी गस्तही वाढवण्यात आलेली आहे. भांडणे टाळून प्रवास करावा, यासाठी रेल्वे पोलीस यंत्रणा विशेष आवाहन करीत आहेत़ अभावाने दिसणारी पोलीसी सतर्कतता यावेळी रेल्वे प्रवाशांच्या मदतीला येत आह़े

परतीच्या प्रवासासाठी ऱा प़ महामंडळाने रत्नागिरी विभागातून 1600 गाडय़ांचे आरक्षण झाले असून 265 गाडय़ांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून गतवर्षीच्या तुलनेत 175 आणखी गाडय़ांची मागणी नोंदवण्यात आली आहे. यावर्षी 1550 गाडय़ांमधून चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी आले होते. ऱा प़ महामंडळाच्या प्रशासनाने ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शिवाय मोबाईल आरक्षणाचा लाभ प्रवाशांनी यावर्षी घेतला. गतवर्षी 1400 गाडय़ा परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी 1600 गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी काही फेऱयांची सेवा प्रवाशांनी यशस्वीपणे घेतली आह़े

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रगतीपथावर आह़े हे काम मार्गी लागण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होत आहेत़ पावसाळी हंगामात कंत्राटदारांनी रस्ता सुरक्षित ठेवावा यासाठी सूचना देण्यात येत आहेत़ यावर्षी महामार्गाचे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यक्षमतेत किमान गुण मिळवू शकला नाही, असे प्रवासी नमूद करत आहेत़ कणवलीत बांधकाम अधिकाऱयावर चिखल ओतण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून झाल़े त्यावर अनेक आक्षेपही आले परंतु महामार्गाची परिस्थिती किमान सुधारल़ी, असे म्हणणे धाडसाचे ठरेल़  रत्नागिरी शहरात सोमवारी नागरिकांनी छत्री घेऊन रस्त्यांवरच्या खड्डय़ांच्या निषेधासाठी आंदोलन केल़े रत्नागिरी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर खड्डेमुक्त रत्नागिरीसाठी धडक मारण्यात आल़ी रस्त्यांना खड्डे का पडले याचे कारण न देण्याची चतुराई नगर परिषदेच्या कारभाऱयांनी दाखवली असली तरी शहरातील दुःखदायक प्रवासावर फुंकर घालण्याची कारवाई होऊ शकली नाह़ी गणपती विसर्जनापूर्वी रत्नागिरी खड्डेमुक्त करा, अशा नगराध्यक्षांच्या सूचना प्रशासनाकडून पाळल्या गेल्या नाहीत़ हे वास्तव या निमित्ताने अधोरेखित झाले आह़े

या आंदोलनात खड्डय़ांमुळे बाधित झालेल्या अनेक बाबी सहभागी झाल्या होत्य़ा  खड्डय़ांमुळे गाडी घसरल्याचे, खड्डय़ात पडून जखमी झालेले काही लोक सहभागी झाले होत़े तर खड्डय़ांमुळे गर्भपात झालेल्या महिलेचे नातेवाईक देखील या आंदोलनात सहभागी झाले होत़े नगराध्यक्ष निवडणुकीला येत्या काही महिन्यात सामोरे जाणाऱया राजकीय पक्षांना याची दखल घ्यावीशी वाटली तर परिस्थितीत निश्चितच सुधारणा होऊ शकेल़ पावसाचा जोर कमी झाल्यानंतर खड्डय़ांसाठी मलमपट्टी योजना अमलात आली तर आंदोलनाला यश मिळाले असे म्हणता येईल़

सुकांत चक्रदेव

Related posts: