|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गणेशाची स्तुती

गणेशाची स्तुती 

सतराव्या-अठराव्या शतकात गणपतीवर श्रद्धा असलेला आणखीन एक हिंदी कवी होऊन गेला. नजीर अकबराबादी (1735-1830) यांचा जन्म आग्रा इथे झाला. यांनी विविध सणांवर आणि देवादिकांवर कविता केल्या आहेत. नजीर अत्यंत मनस्वी आणि कलंदर होते. उत्तर प्रदेश हिंदी संस्थानच्या ‘नजीर ग्रंथावली’मध्ये त्यांची वैयक्तिक माहिती आढळते. घोडीवर बसून फिरायला निघाले की त्यांचे चाहते त्यांची वाट अडवून कविता ऐकवण्याचा आग्रह करीत. नजीरदेखील तत्काळ एखादी रचना जुळवून गाऊन दाखवीत. आग्य्ा्राचे फेरीवाले त्यांची गाणी गाऊन माल विकीत. एका काकडी विपेत्याला नजीरनी गाणे लिहून दिले होते –

क्मया खूब नर्मोनाजुक इस आगरे की ककडी

और जिसमें खासकर फिर इस्कंद की ककडी  

मात्र नजीर यांची लेखणी खरी रमली ती सणांवर आणि देवादिकांवर गाणी रचताना. त्यांनी राखी पौर्णिमा, दिवाळी, होळी, वसंत ऋतू, कंसवध, रासलीला, इ. वर प्रासंगिक गीतरचना केल्या. गणपती, गुरु नानक, भैरवनाथ, महादेवावर गीते लिहिली. श्रीकृष्णावर लिहिताना ते म्हणतात, 

क्मया क्मया कहूं किशन कन्हैय्या का बालपन

ऐसा था बांसुरी के बजैया का बालपन

 त्या काळात आग्रा शहरात होळी हा विशेष लोकप्रिय सण होता. होळीवर त्यांनी वीसहून अधिक कविता आणि गाणी रचली आहेत. गणपतीवर तेरा कडव्यांची कविता लिहिली आहे. त्यातली दोनच कडवी देतो.

अव्वल तो दिल में कीजिए पूजन गनेश जी

स्तुति भी फिर बखानिए धन-धन गनेश जी

भक्तो को अपने देते हैं दर्शन गनेश जी

वरदान बखशते हैं जो देवन गनेश जी

हर आन ध्यान कीजिए सुमिरन गनेश जी

देवेंगे रिद्धि सिद्धि औ अन-धन गनेश जी   1

माथे पै अर्ध चंद्र की शोभा, मैं क्मया कहूं

उपमा नहीं बने है मैं चुपका ही हो रहूं

उस छवि को देख देख के आनन्द सुख लहूं

लैलो निहार दिल में सदा अपने वो जपूं

हर आन ध्यान कीजिए सुमिरन गनेश जी

देवेंगे रिद्धि सिद्धि औ अन-धन गनेश जी   2

Related posts: