|Saturday, September 21, 2019
You are here: Home » उद्योग » अलिबाबा ग्रुपचे चेअरमन जॅक मा निवृत्त

अलिबाबा ग्रुपचे चेअरमन जॅक मा निवृत्त 

सीईओ डेनियल झांग यांच्याकडे सोपवली जबाबदारी

वृत्तसंस्था/ शंघाई

अलिबाबा ग्रुपचे चेअरमन जॅक मा यांनी वयाच्या 55 व्या वषी निवृत्ती घेतली आहे. जॅक मा यांनी निवृत्तीची घोषणा मागील वषीच केली होती. त्यांनी सीईओ डेनियल झांग यांच्याकडे चेअरमन पदाची जबाबदारी सोपवली. जॅक मा आता शिक्षण आणि लोकांना मदत करण्याच्या कामात सहभागी होणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.

अलिबाबा ग्रुपची 1999 मध्ये सुरुवात करण्याआधी ते इंग्रजीचे शिक्षक होते. निवृत्तीसाठी त्यांनी आपला जन्मदिवस आणि शिक्षक दिनाची निवड केली होती.  जॅक मा यांचा जन्मदिवस तसेच चीनमध्ये 10 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. जॅक मा पुढील वर्षापर्यंत कंपनीशी सल्लागार म्हणून जोडले जाणार आहेत.

पुढील 10 ते 20 वर्षात प्रत्येक व्यक्तीने, देशाने आणि सरकारने शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्य देणे गरजेचे आहे, असे मागील वषी झालेल्या शंघाई येथील वर्ल्ड आर्टिफिशियल इन्टेलीजेंस कॉन्फरन्समध्ये जॅक मा म्हणाले होते. जॅक मायांच्या फाऊंडेशनने ग्रामीण भागात प्रतिभावान शिक्षकांना शोधण्यासाठी 2017 मध्ये 4.5 करोड डॉलरची खर्च केले होते. जॅक मा यांची संपत्ती तब्बल 3 लाख करोड रुपये असून, ते जगातील श्रीमंताच्या यादीत 20 व्या स्थानावर आहेत. ते चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणूनही ओळखले जातात.

चीनचे स्टीव्ह जॉब्ज

जॅक मा ने अलीबाबा या कंपनीची स्थापना केली आणि कंपनीत इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांनी 17 मित्रांना तयार केलं. सुरुवातीच्या अडचणींनंतर त्यांच्या कंपनीने वेगाने प्रगती सुरू केली. चीनचे स्टीव्ह जॉब्ज असेही त्यांना म्हणतात. हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. तब्बल 30 नोकऱयामध्ये निराशा मिळाल्यानंतर त्यांनी अलिबाबा सुरू करण्याचे ठरवले. चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचे फाऊंडर जॅक मा आशियातील सर्वात राईस व्यक्ती आहेत.