|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » टाटाची एसयुव्ही सादर

टाटाची एसयुव्ही सादर 

भारतीय ग्राहकांसाठी कंपनीची सणासुदीत भेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टाटा मोटर्सकडून सणाच्या काळात भारतीय ग्राहकांसाठी टाटा नेक्सन क्रॅझ एडिशन भारतात सादर करण्यात आली आहे. नेक्सनची 1 लाखांपेक्षा अधिक विक्री झाल्याने कंपनीने ग्राहकांसाठी स्पेशल एडिशन सादर केली आहे. दोन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध असून, नेक्सन क्रॅझची किंमत 7.57 लाख रुपये आहे तर नेक्सन क्रॅझ प्लसची किंमत 8.17 लाख रुपये आहे. 2018 मध्ये देखील कंपनीने नेक्सन क्रॅझचे एडिशन सादर केले होते.

नेक्सन क्रॅझमध्ये डय़ुअल टोन रंग (ब्लॅक-सिल्वर) थीम आहे. बॉडीचा रंग काळा आहे तर रूफ सिल्वर टच देण्यात आला आहे. याचबरोबर विंग मिरर्स, अलॉय विल्ज आणि फ्रंट ग्रील देखील देण्यात आले आहे. या एडिशनमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 डिझेल इंजिन देण्यात आले आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड एएमटी गेअरबॉक्समध्ये येतात. सध्या नेक्सन ही भारतातील एकमेव अशी कार आहे जिला ग्लोबल एनसीपीएकडून 5 स्टार रेटिंग मिळालेले आहे.

Related posts: