|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग » सरकारी बँकांमध्ये 32 हजार कोटींचा गंडा

सरकारी बँकांमध्ये 32 हजार कोटींचा गंडा 

माहितीच्या अधिकारातून फसवणूक उघड

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील सरकारी बँकांची लूट अद्यापही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 18 सरकारी बँकांमधील फसवणुकीची 2480 प्रकरणे उघडकीस आली आहेत. या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँकांना तब्बल 31 हजार 898.63 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून ही फसवणूक स्पष्ट झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी रिझर्व्ह बँकेकडे याबाबतच्या माहितीची मागणी केली होती. आरबीआयने त्यांना दिलेल्या माहितीतून बँकांमधील  फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षातील जून -ऑगस्ट या तिमाहीत सर्वाधिक फसवणूक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची झाली आहे. यात 1,197 फसवणुकीची प्रकरणे असून, तब्बल 12,012.77 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अलाहाबाद बँकेला फसवणुकीच्या प्रकरणांतून सुमारे 2,855.66 कोटींचा गंडा सोसावा लागला आहे.

घोटाळय़ात वाढ झाल्यानेसरकारी बँका डबघाईला

खासगी बँकांच्या स्पर्धेबरोबरच घोटाळय़ांचे प्रमाण वाढल्यामुळे सरकारी बँका डबघाईला आल्या आहेत. हे गैरव्यवहार कोणत्या प्रकारचे आहेत तसेच त्यात बँका आणि ग्राहकांचे किती नुकसान झाले, याचा तपशील मात्र आरबीआयने उघड केलेला नाही, असे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी स्पष्ट केले आहे.

बँक            फसवणुकीची फसवणुकीची

                         प्रकरणे         रक्कम

स्टेट बँक………….. 1197 12,012.77

अलाहाबाद बँक…… 381.. 2855.46

पीएनबी…………….. 99 . 2526.55

बँक ऑफ बडोदा……. 75.. 2297.05

ओरिएंटल बँक………. 45 . 2133.08

कॅनरा बँक…………… 69.. 2035.81

सेंट्रल बँक………….. 194 . 1982.27

युनाइटेड बँक ………. 31 . 1196.19

कॉर्पोरेशन बँक……… 16 … 960.80

इंडियन ओवरसीज बँक 46 .. 934.67

सिंडिकेट बँक……….. 54 … 795.75

युनियन बँक ………… 51 … 753.37

बँक ऑफ इंडिया …… 42 … 517.00

युको बैंक            34        470.74

Related posts: