|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच

विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

चांद्रयान-2 मधून चंद्रावर सोडण्यात आलेल्या आणि मध्येच संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्त्रोकडून गेले चार दिवस करण्यात येत आहे. संपर्क प्रस्थापित होईल, असा आशावाद संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

चंद्रावर उतरत असताना विक्रम लँडर काहीसा कललेला असल्यामुळे तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्याशी संपर्क तुटलेला असल्यामुळे त्याच्या पासून महत्त्वाची माहिती अद्याप मिळालेली नाही. चार तासांसाठी जरी संपर्क साधण्यात यश मिळाले तरी आतापर्यंत त्याने गोळा केलेली माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल. विक्रम लँडरवर तीन शक्तीशाली ट्रार्न्स्पॉंडरर्स बसविण्यात आले आहेत. ते स्वयंनियंत्रित आहेत. चंद्रावर उतरल्यानंतरही विक्रम सुस्थितीत असल्याने हे ट्रान्स्पाँडरर्स काम करत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑर्बिटरच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला जाण्याची शक्यता जीवंत आहे, असे इस्रोने सांगितले.

डीप स्पेस अँटेनाचा उपयोग

इस्रोने बेंगळूरच्या आपल्या केंद्रापासून काही अंतरावर ब्याललू येथे प्रचंड क्षमतेचे डीप स्पेस अँटेना बसविले आहेत. त्यांच्या माध्यमातून ऑर्बिटरशी आणि ऑर्बिटरमधून विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या शक्तीशाली रेडिओ अँटेनाचाही उपयोग आवश्यकता भासल्यास करण्यात येणार आहे. यापुढचे किमान दहा दिवस हे प्रयत्न सुरू राहणार आहेत.

Related posts: