|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सोपोरमध्ये तोयबाच्या 8 दहशतवाद्यांना अटक

सोपोरमध्ये तोयबाच्या 8 दहशतवाद्यांना अटक 

सेनादल व स्थानिक पोलिसांची कारवाई,

वृत्तसंस्था/ श्रीनगर

काश्मीरमधील सोपोरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 8 संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर बावचाळलेल्या पाकिस्ताने काश्मीरसह देशात इतरत्रही दहशतवादी हल्ले करण्यासाठी प्रयत्न चालवले असून शांतता भंग करण्यासाठी दहशतवाद्यांना घुसवले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शनिवारीच पाकिस्तानी सीमेवर सुमारे 230 दहशतवादी घुसखोरीसाठी दबा धरुन बसल्याचे म्हटले होते. तथापि भारतीय लष्कर सतर्क असून कोणतीही घुसखोरी होऊ देणार नसल्याचेही म्हटले होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक लोकांमध्ये दहशतवाद निर्माण करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात होता. याकरत हे दहशतवादी पोस्टरच्या माध्यमातून धमक्या देण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. याच दहशतवाद्यांनी गेल्या आठवडय़ात येथील दोन नागरिकांची हत्या केल्याचाही पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडे कसून चौकशी केल्यानंतर दहशतवादी कृत्यासाठी आवश्यक असे ड्राफ्टिंग व प्रकाशनासाठी उपयुक्त ठरणारे कॉम्प्युटर व अन्य साहित्य जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख पटवण्यातही पोलिसांना यश आले असून कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाशी संबंधित आहे. यातील तिघांचा दहशतवादी कृत्यांमधील प्रमुख आरोपी आहेत.  एजाज मीर, उमर मीर, तौसिफ नाजर, इम्तियाज नाजर, उमर अकबर, फैजान लतीफ, दानिश हबीब आणि शौकत अहमद मीर यांचा समावेश आहे.

Related posts: