|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » बेल्जियम, हॉलंडचे सहज विजय

बेल्जियम, हॉलंडचे सहज विजय 

युरो पात्रता फेरी : जर्मनीची महत्त्वपूर्ण बाजी,

पॅरिस / वृत्तसंस्था

बेल्जियमने स्कॉटलंडला तर हॉलंडने इस्टोनियाला प्रत्येकी 4-0 अशा एकतर्फी फरकाने पराभूत करत युरो 2020 पात्रता फेरीत आपली आगेकूच कायम राखली. याशिवाय, जर्मनी संघाने उत्तर आयर्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवत आपले प्रयत्न कायम राखले.

रॉबर्टो मार्टिनेझ यांच्या बेल्जियम संघाने येथे स्कॉटलंडविरुद्ध नेहमीच्या शैलीत सर्वोत्तम खेळ साकारला नाही. पण, तरीही हॅम्पडन पार्कवर झालेल्या या लढतीत दुबळय़ा स्कॉटलंडवर त्यांनी सहज वर्चस्व गाजवले. बेल्जियमने गटात आतापर्यंत खेळलेले सहापैकी सहा सामने जिंकले आहेत. इंटरमिलानचा स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने ग्लास्गो येथे नवव्या मिनिटाला आघाडीचा गोल करुन दिला. त्याच्यासाठी हा 49 वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. बचावपटू थॉमस व्हर्माएलेन व टोबी ऍल्डरवेरेल्ड 32 मिनिटांसाठी मैदानात होते.

मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर केव्हिन डे ब्रुएनने तीन गोलसाठी पास दिले होते. नंतर, येथे 8 मिनिटांचा खेळ बाकी असताना त्याने स्वतःच्<ा गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेतला. मागील वर्षात संपन्न झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान प्राप्त करणारा बेल्जियमचा संघ सध्या 11 गुणांवर असून कझाक गटात तिसऱया स्थानी विराजमान आहे. आणखी फक्त चार फेऱया बाकी असून प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ मुख्य युरो स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

आय गटात रशियाचा संघ बेल्जियमसह संयुक्त आघाडीवर असून मॅरिओ फर्नांडिसने 89 व्या मिनिटाला निर्णायक गोल केल्यानंतर रशियाने कझाकला 1-0 अशा निसटत्या फरकाने नमवले.

हॉलंडच्या विजयात बॅबेलचे दुहेरी गोल

अन्य एका लढतीत हॉलंडने इस्टोनियाला नमवले, त्यात रियान बॅबेलच्या दुहेरी गोलांचा मोलाचा वाटा ठरला. हॉलंडने मागील शुक्रवारी हॅम्बर्ग येथे जर्मनीला पराभवाचा धक्का दिला होता. तीच मालिका त्यांनी येथेही कायम ठेवली. हॉलंडकडून 50 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱया मेम्फिस डेपेने येथे तिसरा गोल केला तर लिव्हरपूलच्या जॉर्जिनिओ विजनॅल्डमने देखील चौथ्यांदा गोलजाळय़ाचा वेध घेतला. 2014 वर्ल्डकप सेमीफायनल गाठणाऱया रोनाल्ड कोएमनच्या या संघाला युरोतील स्थान निश्चित करण्यासाठी मात्र अद्याप बरीच उठाठेव करावी लागेल, हे निश्चित आहे. सध्या सी गटात ते उत्तर आयर्लंडपेक्षा 3 गुणांनी पिछाडीवर आहेत. 1988 युरो जिंकणाऱया या संघाची पुढील लढत दि. 10 ऑक्टोबर रोजी उत्तर आयर्लंडविरुद्धच होत आहे.

सध्याच्या घडीला या गटात जर्मनीचा संघ बेलफास्टमध्ये 2-0 अशा विजयानंतर अव्वलस्थानी असून मार्सेल हॅल्स्टनबर्गच्या पहिल्या सत्रातील तर सर्जे गॅन्ब्रीच्या इन्जुरी टाईममधील दुसऱया गोलमुळे जर्मनीने सहज वर्चस्व गाजवले. यापूर्वी झालेल्या अन्य काही लढतीत क्रोएशियाला बाकू येथे अझरबैजानविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. आता दि. 10 ऑक्टोबर रोजी क्रोएशियाची लढत तिसऱया स्थानावरील हंगेरीविरुद्ध होईल. उत्तर मॅसेडोनियाने लॅटवियाला 2-0 असे नमवत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पोहोचण्याच्या आशाअपेक्षा कायम ठेवल्या आहेत. जी गटात येथे मॅसेडोनिया चौथ्या स्थानी आहे. पण, दुसऱया स्थानावरील स्लोव्हेनियापेक्षा ते फक्त तीन गुणांनी पिछाडीवर आहेत. स्लोव्हेनियाने यापूर्वी इस्त्रायलविरुद्ध 3-2 असा नाटय़मय विजय मिळवला तर ऑस्ट्रिया-पोलंड लढत गोलशून्य बरोबरीत राहिली.

Related posts: