|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भावजयीसह चिमुकल्या पुतण्याचा निर्घृण खून

भावजयीसह चिमुकल्या पुतण्याचा निर्घृण खून 

वार्ताहर / कोकरुड

 चव्हाणवाडी-येळापूर (ता. शिराळा) येथील सुरेश दिनकर चव्हाण याने सख्ख्या लहान भावाची पत्नी जयश्री योगेश चव्हाण (वय 24) आणि पुतण्या अविनाश योगेश चव्हाण (वय 2) यांचा खून केल्याची घटना सोमवारी उघड़कीस आली आहे. याबाबत गुन्हा कामोठे (पनवेल) पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेश चव्हाण व योगेश चव्हाण (मूळ गाव चव्हाणवाडी येळापूर ता. शिराळा) हे दोघेजन  कामोठे (पनवेल) येथे एकत्र राहत होते. सुरेश चव्हाण हा मोठा असून लहान योगेश चव्हाण याचे तीन वर्षापूर्वी आटुगड़ेवाडी-मेणी (ता. शिराळा) येथील जयश्री  हिच्या बरोबर विवाह झाला होता. योगेश यास दोन वर्षाचा लहान मुलगा आहे. सुरेश हा अविवाहित असून कोणताही कामधंदा न करता घरीच बसून असायचा. नोकरी व कामधंदा करत नसल्याने त्याचा विवाह ठरत नव्हता. त्यातच लहान भावाचे लग्न झाले माझे अजून नाही. असे तो कायम इतरांना बोलून दाखवायचा. कामधंदा करत नसलेने योगेश याने काही दिवसांपूर्वी त्याला घरातून बाहेर काढले होते. हा राग मनात धरून  सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास योगेश नेहमी प्रमाणे कामावर गेलेला पाहून सुरेश हा योगेश राहत असलेल्या कामोठे येथील सेक्टर 34 मधील एकदंत सोसायटी येथे घरी गेला व घरी त्याने दुपारी पाचच्या सुमारास  भावजय व पुतण्या यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. त्यानंतर घरीच बसून राहीला. योगेश रात्री 11 वाजता घरी आला त्यावेळी आतून दरवाजा बंद असल्याने हाका मारत दरवाजा वाजवला. 20 मिनिटनी भाऊ सुरेश याने दरवाजा उघड़ला असता पत्नी आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. याबद्दल योगेश याने सुरेश यास विचारले असता त्याने स्वतः खून केल्याची कबुली दिली. रात्री उशिरा कामोठे  पोलिसांनी संशयित सुरेश यास ताब्यात घेत अटक केली असून सुरेश याने गुन्हा कबूल केला आहे.

Related posts: