|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

वार्ताहर/ पंढरपूर

रेल्वेने दिलेल्या धडकेत पंढरपूरात दोन अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. ही घटना नवीन बसस्थानकाच्या समोरील असणाऱया रेल्वे रुळावर सोमवारी रात्रीच्या सुमारास झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी एकादशी असल्याने पंढरपूरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्ती या बाहेरील असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यातील एका व्यक्तीच्या मनगटावर श्री विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंदविण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. यातील एका व्यक्तीच्या अंगात लाल रंगाचा तर दुसऱया व्यक्तीच्या अंगात जांभळया रंगाचा शर्ट आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

Related posts: