|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘किसन वीर’ला बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ डिस्टीलरी ऍवार्ड जाहीर

‘किसन वीर’ला बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ डिस्टीलरी ऍवार्ड जाहीर 

वार्ताहर/ भुईंज

गेल्या 43 वर्षापासुन अविरतपणे साखर उद्योगाचा बारकाईने अभ्यासकरून त्याची इत्यंभुत माहिती राज्यातील साखर कारखान्यांना देवून मार्गदर्शन करणाऱया भारतीय शुगर या संस्थेतर्फे देण्यात येणारा देशपातळीवरील बेस्ट ओव्हर ऑल परफॉर्मन्स ऑफ डिस्टीलरी ऍवार्ड किसन वीर सातारा सहकारी कारखान्यास जाहीर झाला आहे. 

 किसन वीर कारखान्याने डिस्टीलरी क्षमतेचा केलेला जास्तीत जास्त वापर, घेतलेला सर्वाधिक उतारा, विक्रमी डिस्टीलरी उत्पादन आदी बाबींचा विचार करून भारतीय शुगर या संस्थेतर्फे देण्यात येणारा बेस्ट ओव्हर ऑल परफॉर्मन्स ऑफ डिस्टीलरी ऍवार्ड भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी कारखान्यास जाहिर झाला आहे. पर्यावरण समृद्धता व शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन काम करित असणाऱया किसन वीर परिवारास यापुर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून या पुरस्काराने किसन वीरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा शनिवार दि.21 सप्टेंबर रोजी दु. 2.00 वा. कोल्हापुर येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात होणार आहे.