|Friday, February 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुचाकी अपघातात विद्यार्थिनी ठार

दुचाकी अपघातात विद्यार्थिनी ठार 

प्रतिनिधी/ म्हापसा

आसगांव पिंपळकडे मंगळवारी सकाळी 9.20 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात म्हापसा डिएमसी कॉलेजची विद्यार्थिनी कु. अपेक्षा नाईक (रा. झरवाडा शापोरा) ही ठार झाली. कु. अपेक्षा कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती.

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपेक्षा आपल्या पेशन दुचाकी जीए03-एच-8018 ने म्हापशाच्या दिशेने आसगाव येथे येत असता तिचा तोल जाऊन ती खाली कोसळली व डोक्याला मार लागून ती ठार झाली. घटनेची माहिती हणजूण पोलिसांना दिल्यावर उपनिरीक्षक विलास दुर्भाटकर यांनी पोलीस पथकासमवेत त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अपेक्षाला म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात आणले. डय़ुटीवरील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुपारी गॉमेकॉत शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यावर उशीरा शोकाकूल वातावरणात मयतावर हणजूण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related posts: