|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्रीकरांच्या स्मृती स्थळाची 13 डिसेंबरला पायाभरणी

पर्रीकरांच्या स्मृती स्थळाची 13 डिसेंबरला पायाभरणी 

प्रतिनिधी/ पणजी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतीस्थळाचा शिलान्यास 13 डिसेंबरला होणार असून यावर 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुंबईतील एका आर्कीटेक्चरल कंपनी या स्थळाचे डिझायनींग करणार आहे. तर चिराग जैन हे काम पहातील असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मंगळवारी यासंदर्भात बैठक झाली त्यात स्मृतीस्थळाच्या डिझाईनला मान्यता देण्यात आली. या बैठकीला तज्ञांची समिती उपस्थित होती. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ हा प्रकल्प करीत आहे. मिरामार येथे हा प्रकल्प होत आहे. या बैठकीला चार आर्कीटेक्ट उपस्थित होते. युसीजे कंपनीचे चिराग जैन यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे संपूर्ण जीवन चरित्रच यातून दाखविले जाणार आहे. त्यांच्या जन्मापासून अंतापर्यंत सर्वच गोष्टीवर भर दिला जाणार आहे. 13 डिसेंबर रोजी त्यांच्या जयंतीदिनी पायाभरणी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधी स्थळाचेही यावेळी नूतनीकरण केले जाणार आहे. खूप अगोदर समाधीस्थळ बांधले आहे. त्याचे नूतनीकरण करणे व त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.

Related posts: