|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ठाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेश मूर्तीला निरोप

ठाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेश मूर्तीला निरोप 

वाळपई  प्रतिनिधी

 गेल्या अनेक वर्षापासून भक्तिभावाने पूजा करणाऱया ठाणे सत्तरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेश मूर्तीला आज रात्री उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला .

यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये टाळ-मृदंगाच्या तालावर दि?डी पथकाच्या लयबद्ध वाद्यावर चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते .

गेल्या अनेक वर्षापासून ठाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेश बाप्पाचे नऊ दिवस थाटात सेवा करण्यात येत असते. यावेळी अनेक प्रकारचे सामाजिक वैचारिक शैक्षणिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.

 याकार्यक्रमांमध्ये नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होत असतात .यंदाही अशाप्रकारचे विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नऊ दिवसांच्या उत्साही वातावरणात गणेश बाप्पासमोर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असतानाच नऊ दिवसानंतर आज गणेश बापाला उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी काढलेल्या मिरवणुकीमध्ये मोठय़ा संख्येने गणेशभक्त व भागातील नागरिक सहभागी झाले होते. गणेश बाप्पाचा जयजयकार करीत ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Related posts: