|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा पालिकेची बैठक बरीच गाजली

म्हापसा पालिकेची बैठक बरीच गाजली 

यापुढे सर्वांना एकत्रित सुट्टी देण्याची नगरसेवकांची मागणी

प्रतिनिधी/ म्हापसा

ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत म्हापसा नगरपालिकेतील सुमारे 80 टक्के कामगार वर्ग दीर्घ रजेवर गेल्याने म्हापसा पालिका क्षेत्रातील कचरा तसाच पडून राहिला. या सणाच्या दिवसात घरोघरी कचरा दुप्पट होतो. मात्र कचरा सर्वत्र साचल्याने वॉर्डात ऐन गणेश चतीर्थीच्या सणात दुर्गंधी पसरली. असा प्रकार यापुढे होऊ नये व मुख्याधिकाऱयांनी सर्व कामगारांना एकत्रित सुट्टी देऊ नये अशी मागणी नगरसेवक सदीप फळारी व राजसिंग राणे यांनी म्हापसा पालिका क्षेत्रात सर्वत्र कचरा साचल्याच्या कारणावरून आजची बैठक बरीच गाजली.

नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. चतुर्थीच्या काळात कचरा साचल्याचा विषय नगरसेवकांनी उचलून धरला. घरोघजे कामगार कचरा गोळा करतात तेच रजेवर गेल्याने हा प्रश्न निर्माण झाला. एकूण पालिका क्षेत्रात 58 कचरा गोळा करणारे कामगार वर्ग आहेत पैकी 80 टक्के कामगार रजेवर गेले. फक्त 20 कामगार कामावर होते त्यामुळे घरोघरी योग्यरित्या कचरा गोळा होऊ शकला नाही. असे नगरसेवक संदीप फळारी व राजसिंग राणे म्हणाले.

म्हापसा पालिका मुख्याधिकाऱयांनी सर्वांना एकाचवेळी सुट्टी कशी काय दिली असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला असता मुख्याधिकारी क्लेन मदेरा म्हणाले की, हे आमच्या मनात होते. आपण कामगारांना एकत्रित सुट्टी देण्याचे टाळले होते याबाबत आपली नगराध्यक्षाची एकत्रित चर्चाही झाली मात्र सुट्टी देत नसल्याच्या कारणावरून काही कामगारांनी आपण व नगराध्यक्ष ख्रिश्चन बांधव असल्याने आम्ही सुट्टी देत नसल्याच्या कारणाने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना सुट्टी द्यावी लागली असे ते म्हणाले. यापुढे हे लक्षात घेतले जील असे ते म्हणाले.

नगरसेवक राजसिंग राणे म्हणाले की ऐन चतुर्थी व दिवाळीच्या सणात हा प्रश्न निर्माण होतो यामुळे कामगार वर्गांना सुट्टी देऊ नये अशी मागणी केली असता मुख्याधिकारी मदेरा म्हणाले की, याबाबत तशा आशयाचा निर्णय घ्या यावर नगराध्यक्ष रायन ब्रागांझा म्हणाले की, यापुढे आमच्यामध्ये एकमेकांना समज देऊन कामगारांचा प्रश्न सोडवूया. अखेर निर्णयाविना हा प्रश्न सोडविण्यात आला. मात्र या प्रश्नी आमची बैठक बरीच गाजली.

म्हापशातील 13 जुन्या इमारती कोसळण्याच्या मार्गावर

म्हापसा जुन्या पालिकेजवळ इमारत पावसाळय़ात जमिनदोस्त झाल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. सदर इमारत रात्रीच्यावेळी कोसळली ही घटना दिवसाकाठी घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती असे नगरसेवक संदीप फळारी यांनी सांगितले. अशा इमारती यापूर्वीच जमिनदोस्त का करण्यात आली नाही. मोठी दुर्घटना घडण्याची वेळ पालिका अधिकारी वर्ग पाहत आहेत काय? असा प्रश्न नगरसेवकांनी केला असता मुख्याधिकारी क्लेन मदेरा म्हणाले की, म्हापशातील 13 इमारती कोसळण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत पालिकेने यादी तयार केलेली आहे. म्हापशात जी इमारत रात्रीच्यावेळी कोसळली त्यात तीन कुटुंबे राहत होती त्याचे प्रकरणही न्यायप्रविष्ठय होते व ते इमारतीमधील खोल्या खाली करू पाहत नव्हते. आम्ही त्यांना नोटीस बजावली होती तसेच याची माहितीही उपजिल्हाधिकाऱयांना दिली होती. त्यांना बाहेर काढण्याचा अधिकार आम्हाला नाही ते काम उपजिल्हाधिकारी करू शकतात. उपजिल्हाधिकाऱयांनीही त्यांना नोटीस बजावलेली आहे मात्र ते न्याय प्रविष्ठय असल्याने त्याकडे कुणीही लक्ष द्यायला पाहत नाही असे मुख्याधिकारी म्हणाले. अशा 13 धोकादायक इमारतींना उपजिल्हाधिकाऱयांनी नोटीस बजावली असून यापैकी 10 जणांनी न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती मुख्याधिकाऱयांनी दिली. म्हापसा पालिकेने पालिका क्षेत्रात असलेल्या धोकादायक इमारतीची नव्याने यादी सादर करण्याची मागणी यावेळी नगरेवकांनी बैठकीत केली.

मलनिःस्सारणाचे काम पूर्णत्वाकडे न्यावे- सुधीर कांदोळकर

म्हापसा मासळी मार्केटच्या तिसऱया मजल्यावर कन्सट्रक्शन काम सुरु होते मात्र मधोमध ते बांधकाम बंद ठेवण्यात आले आहे ते पुन्हा सुरु करून काम पूर्ण करावे अशी मागणी नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी केली. मलनिःस्सारण प्रकल्पाचे काम मधोमध बंद अवस्थेत आहे ते पूर्णत्वाकडे न्यावे अशी मागणीही यावेळी नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी केली. मासळी मार्केटमध्ये लिफ्ट बसविण्याची मागणीही यावेळी त्यांनी बैठकीत केली.

म्हापसा गॅरेज बांधण्याचे कामाचा आदेश देण्यात आला असून जीसुडातर्फे हे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी यावेळी बोलताना दिली. या निवासी वसाहतीमध्ये तिघेजण राहत असून ते खाली करण्यास मागेपुढे होत असून तसे झाल्यास काही प्रमाणात आराखडय़ात बदल करून घ्यावा लागेल असे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी स्पष्ट केले. म्हापसा पालिकेतील प्रशासकीय विभाग 14 फायनेन्स कमिटीच्या वतीने बांधण्यात येणार असून यासाठी 3.27 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती यावेळी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी बोलताना दिली.

Related posts: