|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘क’ वर्ग पदे रद्द झालेली नाहीत

‘क’ वर्ग पदे रद्द झालेली नाहीत 

प्रतिनिधी/ पणजी

‘क’ वर्गातील नोकरभरतीसंदर्भातील जाहिराती मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नेट दिल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ही पदे रद्द झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित रणे हे यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नोटमुळे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

‘क’ वर्गातील नोकरभरतीची प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. मंत्रिमंडळातही याबाबत चर्चा सुरु झाली होती. राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत क वर्गातील नोकरभरती केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. क वर्गातील नोकर भरतीच्या जाहिराती देणे सर्व खात्यांनी थांबवावे असेही या नोटमध्ये स्पष्ट केले होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःच ही पदे रद्द झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार प्रत्येक खाते याचा विचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कोणताही गोंधळ नाही. यासंदर्भातील विधेयकाला मान्यता मिळालेली नाही. राज्यपालांकडून या विधेयकाला मान्यता मिळाली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर प्रवेश अर्जही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य खात्यातील नोकरभरतीच्या जाहिरातीनंतरच मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र याबाबत आरोग्यमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे या एकूणच प्रकारावरुन सरकारमधील वातावरण बदलले असल्याची चर्चा सुरु आहे.

विश्वजित राणे हे नोकरभरतीमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. आरोग्य खात्यातील नोकऱया सत्तरी तालुक्यात व विशेष करुन राणे यांच्या मतदारसंघातच दिल्या जातात असेही आरोप होत आहेत. त्यामुळे भाजपमधील काही नेत्यांच्या नजरा या खात्यातील नोकरभरतीवर आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी वरील निर्णय घेतला अशीही चर्चा आहे.

 

Related posts: