|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मुस्लीम बांधवांकडून मोहरम गांभीर्याने

मुस्लीम बांधवांकडून मोहरम गांभीर्याने 

बेळगाव / प्रतिनिधी

मुस्लीम धर्मियांचा महत्वाचा सण मानला जाणारा मोहरम सण गांभीर्याने पाळण्यात आला. शहर व परिसरात मोहरम निमित्त मंगळवारी ताबुतांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत बँड व ताशाचे वादन करून पारंपारीक पद्धतीने ताबुतचे विसर्जन करण्यात आले.

हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक मानल्या जाणाऱया झेंडा चौक येथील ताबुतांची बँडच्या वादनामध्ये मिरवणूक सुरू झाली. गणपत गल्ली मार्गे खडेबाजार येथे ही मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर काही काळ तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लीम बांधव मोहरम दिवशी शोक व्यक्त करत असल्यामुळे संपूर्ण शहर व परिसरात मोहरम गांभीर्याने पाळण्यात आला.

शहरात कडेकोट बंदोबस्त

मोहरमच्या पार्श्वभुमिवर कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरिता शहरात पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी दुपारनंतर चौका चौकात पोलीस गस्त घालत होते. गणपत गल्ली, खडेबाजार, काकतीवेस रोड या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.

Related posts: