|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नरगुंदकर भावे चौक मंडळातर्फे स्वच्छता कर्मचाऱयांचा सत्कार

नरगुंदकर भावे चौक मंडळातर्फे स्वच्छता कर्मचाऱयांचा सत्कार 

बेळगाव / प्रतिनिधी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरगुंदकर भावे चौक व्यापारी बंधू व रिक्षाचालक यांच्यावतीने मंगळवारी सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कन्नुभाई ठक्कर, अर्बन बॅंकेचे संचालक चंद्रकांत गुंडकल, मराठा बँकेचे संचालक अशोक भोसले, धुव शानभाग, एपीएमसीचे सदस्य महेश कुगजी, सेपेटरी राजेंद्र हंडे यांच्या हस्ते कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते.

दररोज साफसफाई करणाऱया 10 महिला व 10 पुरुष कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. त्यांना साडी, पायमोजे, ब्लँकेट व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी कन्नुभाई ठक्कर यांनी, दररोज होणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावणाऱया कर्मचाऱयांचा सत्कार हा झालाच पाहिजे, असे सांगितले. बाळासाहेब काकतकर यांनी सफाई कर्मचाऱयांचा योग्य सन्मान होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

अशोक भोसले व चंद्रकांत गुंडकल यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्वास पवार, मारुती देवगेकर, विनोद हंगिरकर, वसंत बोराना, गजन्नाथ सिद्दण्णावर, नारायण उंडाळे, महेश मोरे, रजत सिद्दण्णावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बाबुलाल पुरोहित यांनी केले. राजेंद्र हंडे यांनी आभार मानले.

Related posts: