|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » मुंबईत इमारतीचा भाग कोसळला; 17 जणांना काढले सुखरुप बाहेर

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला; 17 जणांना काढले सुखरुप बाहेर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात इमारतीचा एक भाग कोसळून ढिगाऱयाखाली दबलेल्या 17 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळील मंगलदास रोडवर लोहार चाळ येथे युसूफ बिल्डिंग आहे. या चारमजली इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. दरम्यान, स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱयाखाली अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढले.

Related posts: