|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » उन्नाव बलात्कार प्रकरणाची आजपासून रुग्णालयातच सुनावणी

उन्नाव बलात्कार प्रकरणाची आजपासून रुग्णालयातच सुनावणी 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उन्नाव बलात्कार प्रकरणाची आजपासून नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातच सुनावणी घेण्यात येणार आहे.

बलात्कार प्रकरणातील पीडितेवर अजूनही ‘एम्स’मधील ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे पीडितेची साक्ष अद्याप झालेली नाही. ‘पीडितेला स्ट्रेचरवरून न्यायालयात आणणे धोकादायक ठरेल तसेच तिची ओळख स्पष्ट झाल्यास तिचे वैयक्तिक आयुष्य धोक्मयात येऊ शकते’, असे मत नोंदवत न्यायालयाने एम्स ट्रामा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय उभारण्यास परवानगी दिली आहे.

त्यानुसार आजपासून (11 सप्टेंबर) पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.

2017 मध्ये उन्नावमधील एका अल्पवयीन मुलीवर आमदार कुलदीप सेनगरने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी सेनगरविरूद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, आमदार सेनगरविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी पीडितेच्या कारला अपघात झाला होता. या अपघातात तरूणीच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पीडितेसह तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर एम्स मधील ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.

Related posts: