|Saturday, September 21, 2019
You are here: Home » Top News » ‘या’ तीन मंत्र्यांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

‘या’ तीन मंत्र्यांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात विरोधी पक्षांमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश म्हातेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याच्या विरोधात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

लोकसभा निवडणुकांदरम्यान काही विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप प्रवेश केला होता. त्यामधील काही नेत्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जयदत्त क्षीरसागर आणि रिपाईचे अविनाश महातेकर यांचा समावेश आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह संजय काळे, सुरिंदर अरोरा आणि संदीप कुलकर्णी या तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्ये÷ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत दोन रिट याचिका करून या तीनही जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान दिले आहे. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.