|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलीस

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलीस 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि विनाअडथळा पार पडावी, यासाठी यंदा साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

व्यंकटेशम म्हणाले, उद्या (गुरुवार) सकाळी 10 वाजल्यापासून महात्मा फुले मंडई येथून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. मिरवणुकीच्या प्रमुख 39 मार्गांवर 169 सीसीटीव्हीवरून नजर ठेवली जाणार आहे. त्याच बरोबर बॉम्ब शोधक-नाशक पथक, छेडछाड व चोरीविरोधी पथकही तैनात केले जाणार आहे. शहरामध्ये दोन हजार गणेश मंडळे आहेत. त्यापैकी 600 मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर सहभागी होणार आहेत.

मिरवणूक बंदोबस्तात 4 अतिरिक्त आयुक्त, 12 उपायुक्त, 29 सहायक पोलीस आयुक्त, 150 पोलीस निरीक्षक, 461 उपनिरीक्षक या अधिकाऱयांसह 7 हजार 457 कर्मचारी सहभागी असणार आहेत. एसआरपीएफ 2 कंपन्या आणि 700 होमगार्डही तैनात असणार आहेत. पाच जलद प्रतिसाद पथके, पाच दंगल नियंत्रण पथके, लिमा, वज्र, वरून, ही दंगल रोधक पथक संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यासाठी मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस) ताथ पथके तैनात केली जाणार आहेत. या प्रत्येक एका पथकासोबत प्रशिक्षित श्वानदेखील असणार आहे, असेही व्यंकटेशम यांनी सांगितले.

Related posts: