|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » लष्कर-ए-तोयबाच्या मुख्य दहशतवाद्याचा खात्मा

लष्कर-ए-तोयबाच्या मुख्य दहशतवाद्याचा खात्मा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या मुख्य दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

असिफ असे या खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा मुख्य दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. सोपोरमध्ये आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे. त्यानुसार शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, या चकमकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु असून भारतीय जवानांकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.