|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » युवक काँग्रेस ठामपणे उर्मिला यांच्या पाठिशी : सत्यजीत तांबे

युवक काँग्रेस ठामपणे उर्मिला यांच्या पाठिशी : सत्यजीत तांबे 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या उर्मिला मातोंडकर यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. उर्मिला यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे. युवक काँग्रेस ठामपणे उर्मिला यांच्या पाठिशी असल्याचेही तांबे यांनी जाहीर केले आहे.

तांबे म्हणाले, उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपला फारसा परिचय नाही. असे असले तरी त्या आपल्या विचारधरेशी एकनिष्ठ आहेत, याची आपल्याला कल्पना आहे. पक्षांत अंतर्गत गटबाजी आहे, उर्मिलाजी फार राजकीय नसल्यामुळे त्यांना सहन नाही झाले, त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

 

Related posts: