|Saturday, September 21, 2019
You are here: Home » Top News » मोदींनी केले 13500 कोटींच्या लसीकरण योजनेचे उद्घाटन

मोदींनी केले 13500 कोटींच्या लसीकरण योजनेचे उद्घाटन 

ऑनलाईन टीम / मथुरा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जनावरांसाठी सुरु करण्यात आलेल्या 13,500 कोटी रुपयांच्या लसीकरण योजनेचे उद्घाटन केले. दुभत्या गाई, म्हैशींना गंभीर आजारांपासून मुक्त करण्यासाठी ही लसीकरण योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेच्या उद्घाटनानंतर मोदींनी गोसेवा केली. त्यानंतर कचरा वेचक महिलांसोबत कचराही वेचला. यावेळी मोदींनी जनतेला प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले.

यावेळी मोदींनी पंडित दिनदयाळ उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विद्यापीठ आणि संशोधन केंद्राच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी आयोजित गुरांच्या जत्रेचे उद्घाटनही त्यांनी केले. यानंतर पशुपालन आणि पशुपालनाशी संबंधित विभागांच्या विविध योजनांचाही आढावा मोदींनी घेतला. गंभीर आजारांनी ग्रासलेल्या 25 गुरांची लाइव्ह सर्जरीही ते पाहणार आहेत.