|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर; दूध 140 रुपये लीटर

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर; दूध 140 रुपये लीटर 

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

पाकिस्तानमध्ये महागाईने कहर केला आहे. भाजीपाल्यांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचेही भाव गगणाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीपेक्षाही दुधाचे दर पाकिस्तानात जास्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.

पाकमध्ये मागील महिन्यात पेट्रोल 117.83 रुपये प्रति लीटर तर डिझेल 132.88 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले होते. महागाईने त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी पाकने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 4.59 रुपये आणि 5.33 रुपयांची घट केली होती. मात्र, यानंतरही पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 113.24 रुपये आणि 127.24 रुपये दराने विकले जात आहे. तर, पाकिस्तान सरकारने दुधाचे दर प्रतिलीटर 94 रुपये केले आहेत. वाढीव दराने दूध विक्री करणाऱया दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, दुध विक्रेते वाढीव दराने म्हणजेच 140 रुपये दराने दूधविक्री करत आहेत.

Related posts: