|Saturday, September 21, 2019
You are here: Home » Top News » पर्रीकरांच्या स्मारकासाठी मुंबईतील उत्तम जैन आर्किटेक्टची निवड

पर्रीकरांच्या स्मारकासाठी मुंबईतील उत्तम जैन आर्किटेक्टची निवड 

ऑनलाईन टीम / पणजी :

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे होणाऱया स्मारकासाठी मुंबईच्या उत्तम जैन आर्किटेक्टने तयार केलेले डिझाइन स्वीकारण्यात आले आहे.

मिरामार येथे गोव्याचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीचे डिझाइनही त्यावेळी उत्तम जैन यांनी तयार केले होते. भाऊसाहेबांच्या समाधी शेजारीच आता पर्रीकर यांचे स्मारक होणार आहे. या स्मारकासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या स्मारकात पर्रीकर यांच्या कारकिर्दिची सुरवातीपासूनची माहिती देणारे फोटो प्रदर्शन असेल तसेच दृक श्राव्य माध्यमातूनही त्यांच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे. तसेच या स्मारकाला व्यापक संकुलाचे स्वरुप असेल.ध्यानधारणेसाठीही येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीसमोर पाच कंपन्यांनी काल नियोजित स्मारकाच्या डिझाइनचे सादरीकरण केले. त्यामधील उत्तम जैन आर्किटेक्टस्ची निवड करण्यात आली.