|Saturday, September 21, 2019
You are here: Home » Top News » कुत्रा चावल्याने दोन वर्षीय मुलीचा मृत्यू

कुत्रा चावल्याने दोन वर्षीय मुलीचा मृत्यू 

ऑनलाइन टीम / औरंगाबाद

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंन दिवस वाढत चालला आहे. कुत्रा चावल्यामुळे अक्षदा वावरे या दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. आज, बुधवारी सकाळी अक्षदाच्या डोक्मयाला कुत्रा चावला. औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली. कुत्र्याने चावा घेतल्यावर उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

ही लहान मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी भटक्मया कुत्र्याने हल्ला केला. तिच्या अंगावर झडप घालून कुत्र्याने तिचा चावा घेतला. त्याचवेळी कुत्र्याने तिच्या डोक्मयालाही चावा घेतला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

नागरिकांकडून महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कुत्र्यांबाबत वारंवार तक्रारही करण्यात आली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या हलगर्जीपणा वावरे कुटुंबीयांच्या दुःखाला कारणाभूत आहे.