|Monday, January 27, 2020
You are here: Home » leadingnews » निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही : हर्षवर्धन पाटील

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही : हर्षवर्धन पाटील 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही असे म्हणत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसंच त्यांनी मोदी सरकारच्या धाडसी निर्णयांचं कौतुकही केलं आहे. मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही, पक्ष देईल ती जबाबदारी मी सांभाळायला तयार आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून लढणार असल्याची घोषणा केली. हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा अनुभवी नेता भाजपात आल्याने भाजपाचं बळ वाढेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

चंदकांत पाटील म्हणाले, हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये खूप उशिरा आले. ते जर लोकसभा निवडणुकीवेळी आले असते तर बारामती जिंकली असती. हर्षवर्धन पाटील खासदार झाले असते, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसंच जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासनही पाटील यांनी दिलं.

 

Related posts: