|Saturday, January 25, 2020
You are here: Home » leadingnews » विधानसभा निवडणुकांच्या तारखा 2-3 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकांच्या तारखा 2-3 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड या तीन राज्यांत याचवषी विधनसभा निवडणुका होत असून प्रथम महाराष्ट्र व हरयाणात तर नंतर झारखंडमध्ये निवडणुका होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र व हरयाणा या दोन्ही राज्यांत मतदान व मतमोजणी प्रक्रिया दिवाळीआधी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 2014 मध्ये या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती तर 15 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते.

 

Related posts: