वाद दीराशी, नवरा कशाला सोडायचा? : सुप्रिया सुळे

ऑनलाइन टीम /औरंगाबाद :
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्कील भाष्य केलंय. हर्षवर्धन पाटील यांचं भाषण ऐकून मी खुप वेळा त्यांना फोन केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. राहुल गांधी, हर्षवर्धन पाटील आणि माझी कधीच भेट झाली नाही, असा दावा करत भांडण दीराशी आणि नवरा कशाला, सोडता असा टोमणाही सुप्रिया सुळे यांनी लावला.
औरंगाबादमधील एमजीएम महाविद्यालयात बोलताना सुप्रिया सुळेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये अलिबाबा आणि 40 चोर असं म्हटलं होतं. आता त्यापैकी अनेक जण त्यांनी स्वतःच्या पक्ष घेतले आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.