|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » केंद्राच्या मोटार परिवहन कायद्याला तूर्तास स्थगिती : रावते

केंद्राच्या मोटार परिवहन कायद्याला तूर्तास स्थगिती : रावते 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्याला सर्व स्तरातून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात या कायद्याला तूर्तास स्थगिती दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.

परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, नवीन मोटार परिवहन कायद्यामध्ये अनेक जाचक गोष्टींचा समावेश होता. वाहतूक नियम मोडणाऱयास भरमसाठ आर्थिक दंडापासून ते शिक्षेपर्यंतच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. शिवाय वाहनचालकांना डेसकोडही सक्तीचा करण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दिवाकर रावते यांनीही गेल्याच आठवडय़ात या कायद्याला विरोध दर्शविला होता.

 

Related posts: