|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तैशियापरी पूजी द्विजा

तैशियापरी पूजी द्विजा 

एकनाथ महाराज पुढील कथा वर्णन करतात-

हेमसिंहासनीं आदिमूर्ती। बैसला असे सहजस्थिती। द्विजासी देखोन श्रीपती। भाव चित्तीं जाणिला। याचिया आगमनविधी। थोर होईल कार्यसिद्धी। फावली एकांतांची संधी । होय सद्?बुद्धि ब्राह्मण ।

सुवर्ण सिंहासनावर सर्व देवांचा आदिदेव भगवान श्रीकृष्ण बसला होता. सुदेवाला पाहताच, क्षणात श्रीकृष्णाने त्याच्या मनातील, द्वारकेला येण्यामागचा भाव जाणला. हा ब्राह्मण सद्बुद्धी आहे. याच्याबरोबर एकान्तात वार्ता करण्याची आयती संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे मोठीच कार्यसिद्धी होणार आहे, हे श्रीकृष्णाने मनोमन जाणले.

सिंहासनाखालती उडी । घालूनि दोन्ही कर जोडी ।

नमन साष्टांगपरवडी । पूजी आवडी द्विजातें ।

अमर करिती कृष्णपूजा । तैशियापरी पूजी द्विजा ।

ब्राह्मणदेव कृष्णराजा । ब्राह्मणपूजा तो जाणे ।

ब्राह्मणासी मंगलस्नान । देऊनि पीतांबर सुमन चंदन। सन्निध बैसोनि आपण । दिधलें भोजन यथारुचि। शय्या घालुनि एकांती । अरळ सुमनांची निगुती ।  विडिया देऊनि श्रीपती । शयन करविती द्विजातें । कृष्ण बैसोनियां शेजारी । ब्राह्मणाचे चरण चुरी ।  येरू म्हणे गा श्रीहरी । करिं धरी कृष्णातें ।

सुदेवाला पाहून श्रीकृष्णाने सिंहासनावरून खाली उडी घेतली, धावत तो सुदेवाजवळ आला. सुदेवाने श्रीकृष्णाला नमस्कार करायच्या आत देवाने त्याला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. राजाने विद्वानाचा आदर करावा ही भारतीय परंपरा आहे. ज्याप्रमाणे इतर देव भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात त्याप्रमाणे देवाधिदेव श्रीकृष्णाने सुदेवाची अत्यंत आवडीने पूजा केली. परिमलद्रव्याचा चिखल झाला. कापूर, कस्तुरी, चंदन, मर्दून पूजा केली. फुले वाहिली. वस्त्रे, अलंकार दिले. विद्वान सर्वत्र पूज्यते, हे साऱया राजसभेला कळावे म्हणून श्रीकृष्णाने राजसभेतच हा पूजेचा विधी केला. त्यानंतर राजसभा विसर्जित केली. मग सुदेवाला एकान्ती नेले. त्याला मंगलस्नान घातले. त्याला फुले वाहिली, चंदन लावले. जवळ बसवून त्याला आवडीचे भोजन दिले. विडा दिला. सुगंधी सुमनांची शेज सजवून त्यावर सुदेवाला झोपवून देव स्वतः त्याचे पाय रगडू लागले. सुदेवाला अवघडल्यासारखे झाले. त्याने कृष्णाचे हात धरले.

ऐकें स्वामी देवाधिदेवा । आम्हीं करावी तुझी सेवा।

तूं पूजितोंसी भूदेवा । ब्राह्मण देव म्हणवूनिया ।

निजात्मभावें उचितें । हृदयीं साहिले लाथेतें ।

तें हित नव्हेचि आमुतें । विपरीतार्थ फळला असे ।

तुझिया पूजा पूज्य जाहलों । तेणें गर्वासी चढिन्नलों ।

कृष्णसेवेसी नाडलों । थोर वाढलों अभिमानें ।

तूं यज्ञपुरुष नारायण । तुज याज्ञिक नेदिती अन्न ।

वृथा गेलें त्यांचें हवन । कर्मठपण कर्माचें ।

सर्वांभूती भगवद्भावो । नपुजे तंव न भेटे देवो ।

तैसा मी ब्राह्मण नोहें पाहा हो । जाणसी भावो हृदयींचा ।

सुदेव कृष्णाला म्हणाला-हे स्वामी देवाधिदेवा! आम्हीच आपली पूजा करायला हवी तर भूदेव म्हणून आपणच आमची पूजा करता.

Ad.  देवदत्त परुळेकर

Related posts: