|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चला, नियम पाळू

चला, नियम पाळू 

परवा दुपारी म्हणे एका महिलेला फोन आला, ‘अमुक अमुक तुमचा कोण?’

‘माझा मुलगा आहे. का, काय झालं?’

‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. पंचवीस हजार रु. आणा आणि त्याला घेऊन जा.’’

“थांबा, मी तुमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करते.’’

“अहो ताई, मी पोलीसच बोलतोय. तुमच्या मुलाने एकाच वेळी रहदारीचे अनेक नियम तोडले आहेत आणि एकूण दंड पंचवीस हजार रुपये झाला आहे. तुमचा मुलगा ज्या गाडीवर आहे त्या गाडीची किंमत दहा हजार रुपये देखील होणार नाही.’’ 

वरील किस्सा अतिशयोक्त वाटेल. पण अगदी अशक्मय नाही. पूर्वी रहदारीच्या नियमभंगाबाबत ऐकलेला विनोद-एक दुचाकीस्वार सिग्नल तोडून जातो. पोलीस त्याला पकडून विचारतो, ‘तुला सिग्नल दिसला नाही का?’ तो म्हणतो, ‘सिग्नल दिसला होता, पण तुम्ही दिसला नव्हता.’ लोक असे निगरगट्ट असल्यावर काय करणार. एका परिचिताने जुनी स्कूटर विकली. कॅश रक्कम घेतली आणि आरटीओचे कागदपत्र नव्या मालकाच्या नावावर करायचा आळस केला. मधल्या काळात नव्या खरेदीदाराने भरपूर नियम तोडले. स्कूटर जुन्या मालकाच्या नावावर असल्याने दंडाची सगळी बिले मूळ मालकाच्या नावावर फाडली गेली. स्कूटर विकून आलेले जवळपास सगळे पैसे दंड भरण्यात गेले!

हल्ली पोलिसांनी वाहनचालकांना पकडणे बरेच कमी झाले आहे. चौकाचौकात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यात वाहनचालक सापडला की त्याला मोबाईलवर किंवा पोस्टाने नियमभंग करतानाचा फोटो येतो. मग दंडाची वसुली होते. या सीसीटीव्हीमुळे चिरीमिरी प्रकरण कमी झाले असावे असा अंदाज आहे.  सीसीटीव्हीबाबत सोशल मीडियावर आलेले इशारे आणि प्रतिइशारे मजेदार आहेत.

‘दुचाकीस्वारांनो, मैत्रिणीला लिफ्ट देताना सावध रहा. एकही नियम तोडू नका. नाहीतर तिला मागे बसवून सिग्नल तोडतानाचा फोटो तुमच्या घरी पोचेल. पोलीस आणि बायको-दोघांकडून शिक्षा होईल.’ ‘माझी मैत्रीण कायम तोंडाला स्कार्फ बांधते. तिने दुसऱया मित्राला लिफ्ट दिली तरी मला कळत नाही. मी विचारलं तर म्हणते की मी मैत्रिणीला माझी गाडी दिली होती.’ ‘कधी कधी गर्दी नसते. लाल सिग्नल चालू असतो. पोलीस हाताने खूण करून पुढे जायला सांगतो. अजिबात जाऊ नका. सीसीटीव्हीमध्ये पोलीस येईलच असे नाही. तुम्हाला मात्र दंड होऊ शकेल.’

Related posts: