|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गणेश विसर्जनचा पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर पोलिसांचे संचलन

गणेश विसर्जनचा पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर पोलिसांचे संचलन 

प्रतिनिधी/कोल्हापूर

शहर उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मुख्य विसर्जन मार्गावर सशस्त्र संचलन केले. करण्यात आले. यामध्ये शहरातील चार पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी, कर्मचारी, दोन स्ट्रायकिंग फोर्स सहभागी झाले होते.

गणेश विसर्जन सोहळ्यात अनुचित घटनेवरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक कट्टे यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौक येथून पोलिसांच्या सशस्त्र संचलनाला सुरवात झाली. गणेश विसर्जन मुख्य मार्गावरील मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे गंगावेश या मिरवणूक मार्गावर संचलन करण्यात आले. यामध्ये जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, लक्ष्मीपुराचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, राजारामपुरीचे निरीक्षक एन के घोगरे, करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्यासह राखीव सुरक्षा रक्षक दल, पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असे एकूण 400 कर्मचार्यांची संचलनात सहभागी झाले होते.  

दसरा चौकात दंगलकाबूची रंगीत तालीम

गणेश विसर्जन मिरवणुकीत होणार्या गर्दीवेळी अनुचित घटनेवरुन दंगल उसळली. तर ती दंगल कशापध्दतीने हाताळायची याकरीता पोलीस दलाच्यावतीने पूर्वतयारी म्हणून दसरा चौकात दंगल काबूची रंगीत तालीमी घेण्यात आली.

 

Related posts: