|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पदाधिकाऱयांचा बहिष्कार, शिक्षकांचीही नाराजी

पदाधिकाऱयांचा बहिष्कार, शिक्षकांचीही नाराजी 

भरती व बदलीसाठी समुपदेशनास प्रारंभ, जि. प. पदाधिकाऱयांच्या भूमिकेने पोलीस बंदोबस्त तैनात  

प्रतिनिधी/ रत्नागिरी

नव्या प्राथमिक शिक्षकांची भरती व आंतरजिल्हा बदल्यांच्या बुधवारी सुरू झालेल्या समुपदेशनाला वादाची किनार लाभली आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत समुपदेशन प्रक्रिया राबवताना समन्वय न राखल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱयांनी प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. दुसरीकडे ठरलेल्या कार्यवाहीत बदल करण्यात आल्याने शिक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात आलेल्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती व आंतरजिल्हा शिक्षक बदल्यांसाठी 11 सप्टेंबर रोजी स्वा. वि.दा.सावरकर नाटय़गृहात  संवेदनशील वातावरणात समुपदेशन प्रक्रियेला सुरूवात झाली. जि. प. पदाधिकाऱयांनी घेतलेल्या बहिष्काराच्या भुमिकेमुळे नाटयगृहाबाहेर सकाळपासून  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच प्रक्रियेच्या ठिकाणी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चित्रीकरण देखील करण्यात येत होते.

  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता या प्रक्रियेला प्रारंभ झाला. जुन्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचे यावेळी अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.  मात्र सर्व महिला शिक्षकांना या प्रक्रियेवेळी प्राधान्य देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली. त्यामध्ये सेवाज्येष्ठतेत कमी असलेल्या महिला शिक्षकांचा देखील समावेश करण्यात आल्याने सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर आलेल्या शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना उपस्थित शिक्षकांमधून व्यक्त करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱयांनाही बाहेर काढण्यात आल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.

   समुपदेशन प्रक्रिया जि. प .पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत घेतली जाते. मात्र बुधवारी कोणताही पदाधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. प्रधानसचिवांकडून वेगवेगळे आदेश प्राप्त झाल्याचे कारण प्रशासनाने पुढे केल्याने त्याबाबत उपस्थित शिक्षकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  नवी शिक्षक भरती झाली तरी आतंरजिल्हा बदलीने बाहेर जाणाऱया शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या कायम राहणार असल्याने जिल्हा परिषद पदाधिकाऱयांचा या प्रक्रियेला विरोध आहे.   

बदली झालेल्या शिक्षकांना हजर करून घेण्यास नकार

जि.प.प्रशासनाने 197 आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना तत्काळ मुक्त करण्याचे  आदेश काढले. त्या धोरणावर पदाधिकाऱयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पण या बदली केलेल्या शिक्षकांना त्या-त्या जिल्ह्य़ात हजर करून घेण्यास तेथील प्रशासनाने नकार दर्शवल्याची चर्चा शिक्षक गोटातून सुरू आहे. त्यामुळे बदली झालेले शिक्षक संभ्रमात सापडले असून शिक्षक संघटनांशी संपर्क साधून चर्चा करताना दिसून आले.

जि.प. पदाधिकाऱयांचा अपमान हे विकासाच्या दृष्टीने वाईट

जि.प.प्रशासनाने शिक्षक बदल्या व ऑनलाईन शिक्षक भरती प्रक्रियेत येथील पदाधिकाऱयांशी समन्वय राखणे गरजेचे होते. पण हा समन्वय न राखताच आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडले आहे. त्यामुळे जिल्हय़ात रिक्त पदांचा पुन्हा र्गोधळ निर्माण होणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासना अशा प्रक्रियेत एकत्र यायला हवे. पण अशावेळी पदाधिकाऱयांचा अपमान होणे हे जिल्हय़ाच्या विकासाच्या दृष्टीने खूप वाईट आहे. यासंदर्भात आपण प्रधान सचिवांशी देखील बोललो असल्याचे म्हाडा अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी सांगितले आहे.

Related posts: