|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मणेरी जंगलात अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत

मणेरी जंगलात अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत 

वार्ताहर / दोडामार्ग:

मणेरी जंगलात बेशुद्धावस्थेत अनोळखी व्यक्ती निदर्शनास आल्याने काजूबागायतीमध्ये गेलेल्या महेश गवस यांनी ही खबर पोलिसांना देताच लागलीच त्या व्यक्तीला दोडामार्ग पोलिसांनी येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात त्या व्यक्तीला पाठविण्यात आले.

महेश मधुकर गवस आपल्या मणेरी येथील काजूबागेत जात होते. त्यावेळी येथील जंगलात एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. याबाबत श्री. गवस यांनी पोलीस स्टेशनमध्ये ही खबर दिली. यावेळी पोलीस हवालदार जाधव त्या ठिकाणी गेले व त्या व्यक्तीला त्यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे पाठविण्यात आले. येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदरची व्यक्ती कोणाच्या परिचयाची असल्यास दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे