|Saturday, September 21, 2019
You are here: Home » उद्योग » अलीबाबाची धुरा आता डॅनियल झॅग यांच्या हाती

अलीबाबाची धुरा आता डॅनियल झॅग यांच्या हाती 

अलीबाबाचे उदयोन्मुख म्हणूनही गौरव

वृत्तसंस्था/ बीजिंग

जगातील सर्वात मोठा विस्तार असणारी चीनमधील ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा कंपनीचे अध्यक्ष जॅक मा यांनी आपले अध्यक्षपद नुकतेच सोडले आहे. तर सध्या अलीबाबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॅनियल झॅग हे संचालक मंडळाचा अतिरिक्त कारभार सांभाळणार आहेत.

डॅनियल झॅग (वय 46) 2015 पासून कंपनीच्या सीईओ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे असणाऱया विशेष कौशल्यामुळे ते जॅक मा यांच्यापेक्षाही अधिक व्यवहारीक असल्याचे सांगण्यात येत आहे. 2007 रोजी अलीबाबा सोबत जोडलेले झॅग यांची प्रथम मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर ताओबाओ ऑनलाईन मोर्केटप्लेस काम केले. पुढे त्यांना टीमॉलचे अध्यक्ष बनविण्यात आले होते. आणि 2015 पासून झॅग सीईओ पद सांभाळत आहेत.

अलीबाबामध्ये विशेष योगदान

अलीबाबाचे एक उदयोन्मुख योद्धा म्हणून झॅग यांचा गौरव करण्यात येत आहे.

त्यांच्या अंगी व्यवहार कौशल्य व अन्य कलागुण संपन्न असणाऱया गोष्टीमुळेच त्यांचा गौरव केला जात आहे.