|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग » भारती एअरटेलकडून जीबीपीएस स्पीडचा प्लॅन सादर

भारती एअरटेलकडून जीबीपीएस स्पीडचा प्लॅन सादर 

नवी दिल्ली

 देशात सध्या जिओच्या नवनवीन योजनांमुळे अन्य दूरसंचार कंपन्या तोटय़ाचा सामना करत आहेत. त्याला टक्कर देण्यासाठी अन्य कंपन्या सवलतीच्या योजना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये भारती एअरटेल या दूरसंचार कंपनीने ब्राडब्रँडसेवा ‘एअरटेल एक्सट्रीम फायबर’ या योजनेचे सादरीकरण केले आहे. 3,999 रुपयामध्ये महिन्याला एक गीगाबाईट प्रति सेकंद स्पीड देणारी योजना ग्राहकांना देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एअरटेलच्या या योजनेमुळे स्पर्धक कंपन्यांसोबतची स्पर्धा वाढणार असल्याचे अनुमान कंपनीने नोंदवले आहे. ‘एअरटेल एक्सट्रीम फायबर’ सेवा दिल्ली, गुडगांव, फरीदाबाद, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पूणे, बेंगळूर, हैदराबाद, चेन्नई, चंदीगढ, कोलकाता, इंदौर, जयपूर आणि अहमदाबाद या शहरांमध्ये सुरु करण्यात आली आहे.

Related posts: