|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग » आर्थिक वर्ष 2018-19मध्ये पेटीएमचा झाला तोटय़ाचा प्रवास

आर्थिक वर्ष 2018-19मध्ये पेटीएमचा झाला तोटय़ाचा प्रवास 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात डिजिटल व्यवहारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये अनेक कंपन्यांनी मोबाईल वॉलेट सुविधा ग्राहकांसाठी सुरु केल्या आहेत. तर काहींनी कॅश बॅक सारख्या सवलती लागू केल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु यातील पेटीएम कंपनीला मात्र मागील वर्षात मोठा तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा 165 टक्क्यांनी वाढत गेल्याची नोंद करत दररोज 11 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा पेटीएमला सहन करावा लागला आहे. तर उत्पन्नात मात्र फायदा झाला आहे.

बाजारात डिजिटल पेमेन्टमधील गुगल पे, फोन पे यासोबत अन्य बँकांची मोबाईल बँकिंग सुविधा असल्याने पेटीएमला मोठय़ा स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. यात कंपनीचे उत्पन्न 3.319 कोटीवर राहिले आहे. जे 2017-18 या आर्थिक वर्षात 3,29 कोटी रुपये झाले होते. पेटीएम मनी फॉर म्युच्युअल फंड इन्वेस्टमेन्ट, पेटीएम फायनान्स सर्व्हिस, पेटीएम एटरटेन्टमेन्ट सर्व्हिस सोबत अन्य सेवाचा समावेश पेटीएमच्या व्यवहारासोबत आहे.

चालू वर्षात सुरुवातीच्या तीन महिन्यांत पेटीएममधून 1.2 अब्ज व्यवहार झाले असून यातील 1 कोटी 40 लाख व्यवहार किरकोळ स्टोरमधून करण्यात आल्याची नोंद केली आहे. तर पेटीएमची सहयोगी कंपनी वन-97 कम्युनिकेशनला आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 3,959.6 कोटी रुपयाचा निव्वळ तोटा झाला आहे.

Related posts: