|Saturday, September 21, 2019
You are here: Home » उद्योग » आयसीआयसीआय लोम्बार्डचा स्टँडर्डशी करार

आयसीआयसीआय लोम्बार्डचा स्टँडर्डशी करार 

पुणे

 आयसीआयसीआय लोम्बार्ड या भारतातील आघाडीच्या खासगी नॉन-लाइफ इन्शुरन्स कंपनीने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेशी भागीदारी केली असून, याद्वारे बँकेच्या ग्राहकांना या इन्शुरन्स कंपनीची वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध होणार आहेत.

या सहय़ोगाद्वारे, देशात जनरल इन्शुरन्सबद्दल जागृती व प्रसार करण्याबरोबरच स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या देशभरातील शाखांच्या जाळय़ाचा लाभ घेण्याचे आयसीआयसीआय लोम्बार्डचे उद्दिष्ट आहे. आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले, भारतात बँकिंग सेवा देण्याच्या बँकेच्या 160 वर्षांहून अधिक वर्षांच्या समृद्ध परंपरेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे वेल्थ मॅनेजमेंट इंडियाचे प्रमुख नितीन सिंग म्हणाले, या सहय़ोगामुळे आम्हाला सक्षम व वैविध्यपूर्ण जनरल इन्शुरन्स उत्पादने देणे शक्मय होईल.