|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग » ऍपलकडून वॉच आवृत्ती-5 सादर

ऍपलकडून वॉच आवृत्ती-5 सादर 

महिलांसाठी उपयुक्त फिचर्सची सुविधा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऍपल कंपनीकडून आयपॅड, ऍपल टीव्ही प्लस, आयफोनची 11 वी आवृत्ती आदी उत्पादनांचे मंगळवारी सादरीकरण केले. त्यापोठोपाठ ऍपल वॉच-5 चे सादरीकरण करण्यात आले आहे. दिवसभरात डिस्प्लेवर वेळ व आरोग्यविषयक माहिती असणारे फिचर असून यात महिलांच्या मासिक पिरियडसह अन्य वैयक्तिक माहिती या वॉचमध्ये नोंदवत ती अपडेट करण्याची सुविधा असल्याची माहिती ऍपलकडून दिली आहे.  

महिलांच्या आरोग्यावर आधारीत अभ्यास करुन नॅशनल इंस्टिटय़ूट ऑफ इव्हायरमेन्ट हेल्थ सायन्स आणि हॉवर्ड टी.एच. चन स्कूल ऑफ पब्लिक यांनी एकत्रित हे संशोधन केले आहे. नंतर आरोग्य फिचरची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले.

विशेष सुविधा

s अलवेज ऑन रेटिना डिस्प्ले

s लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम वॉच ओएस-6

s एका चार्जवर 18 तास चालण्याची क्षमता,

s 150 देशांमध्ये चालणार अत्यावश्यक कॉलिंग फिचर

s गोल्ड, स्पेस ब्लॅक आणि ब्लॅक या रंगात ही घडय़ाळे उपलब्ध होणार आहेत.

पूर्व नोंदणी

ऍपलचे 5 आवृत्तीचे वॉचचे बुकिंग 10 सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. किरकोळ विक्री 20 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार असून ऍपल वॉच जीपीएस-40,900 किंमत

s जीपीएस सेल्यूलर……… 49,900 रु.

s 3 जीपीएसची किंमत     20,900रु.

s जीपीएस  सेल्यूलर         29,900 रु.

Related posts: