|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स-निफ्टीत तेजीची नोंद

सेन्सेक्स-निफ्टीत तेजीची नोंद 

सेन्सेक्स 125 अंकानी वधारला : येस बँकेचे समभाग 13 टक्क्यांनी तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ात मुंबई शेअर बाजार (बीएसई) पहिल्या दिवशी सुरु राहला. परंतु मंगळवारी तो मोहरम असल्याच्या कारणांमुळे बंद राहिला. बुधवारी नेहमीप्रमाणे शेअर बाजार सुरु राहिले होते. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 125 अंकानी वधारत जात निर्देशांक 37,270.82 वर बंद झाला. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी दिवसअखेर 32.65 अंकानी तेजी नोंदवत 11,035.70 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरातील व्यवहारात बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील समभागांची समाधानकारक कामगिरी झाली. अशियासह अन्य बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याने त्याचा फायदा मुंबई शेअर बाजाराला झाल्याचे दिसून आले. यात  येस बँकेचे समभाग 13.47 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. डिजिटल व्यवहार करणारी पेटीएम येस बँकेचे राणा कपूर यांची हिस्सेदारी खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. या कारणामुळे बँकेचे समभाग वधारले आहेत.

 टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील, वेदान्ता, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, स्टेट बँक, हीरोमोटो कॉर्प, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एशियन पेन्टस, ऍक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग 10.21 तेजीत राहिले होते. या उलट ओएनजीसी, एचसीएल टेक, एनटीपीसी, सन फार्मा, टीसीएस, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग मात्र 2.93 टक्क्यांनी घसरल्याची नोंद करण्यात आली.

मुख्य क्षेत्रात तेजी

रियल्टी, वाहन, धातू निर्मिती, औद्योगिक क्षेत्र, फायनान्स आणि दूरसंचार या क्षेत्रांतील निर्देशांक 4.45 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. तर आयटी, टेक एफएमसीजी, ऑईल ऍण्ड गॅस यांचे निर्देशांक मात्र 1.29 टक्क्यांनी घसरल्याचे पहावयास मिळाले आहे.

Related posts: